भूतानमध्ये पीएम मोदींच्या हस्ते रूपे कार्ड लाँच

भूतानमध्ये पीएम मोदींच्या हस्ते रूपे कार्ड लाँच
भूतानमध्ये पीएम मोदींच्या हस्ते रूपे कार्ड लाँच

भारत आणि भूतानचे संबंध पूर्वीपासून घनीष्ट असे राहिलेले असून या रूपे कार्डमुळे ते आणखी दृढ होतील

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते भूतानमध्ये 'रूपे कार्ड' लाँच करण्यात आले.
  • भारत आणि भूतानचे संबंध पूर्वीपासून घनीष्ट असे राहिलेले असून या रूपे कार्डमुळे ते आणखी दृढ होतील. तसेच या कार्डमुळे दोन्ही देशातील व्यापारात मदत मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच भूतानचे पंतप्रधानांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मोदींच्या हस्ते रूपे कार्ड आणि हायड्रोलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे उद्धाटन करण्यात आले. या दौऱ्यात मोदी दोन्ही देशाचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भूतानमधील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग यांचे संयुक्त निवेदन मीडियासमोर देण्यात आले. पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला मला भूतानला येण्याची संधी मिळाली. हे माझ्यासाठी भाग्यच आहे.
  • भूतान हे आपले शेजारी आहे, व हे आमच्यासाठी भाग्यच आहे. दोन्ही देश एकत्र मिळून पुढे जात आहेत, 
  • १३० कोटींच्या भारतीयांत भूतानबद्दल विशेष प्रेम आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला मी भूतानमध्ये आलो त्यामुळे मला आनंद झाला आहे, असेही मोदी यांनी म्हटले. दरम्यान, पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना 'गार्ड ऑफ हॉनर' देण्यात आला.
  • तिथून पुढे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना स्वागतासाठी हजारो नागरिक रंगीबेरंगी वेशात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हाती तिरंगा घेऊन उभे होते. 

 

भूतान:-

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »