बुकरच्या लघुयादीत रश्दी आणि मार्गारेट अ‍ॅटवूड

बुकरच्या लघुयादीत रश्दी आणि मार्गारेट अ‍ॅटवूड
बुकरच्या लघुयादीत रश्दी आणि मार्गारेट अ‍ॅटवूड

तब्बल १९ वर्षांनी ‘बुकर च्या यादीत पुस्तकाचा समावेश रश्दी

  • सर्वोत्तम इंग्रजी कथात्म साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाची लघुयादी जाहीर झाली असून त्यात याआधी या पुरस्कारावर मोहर उमटविणारे  ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी आणि कॅनडामधील लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड या दिग्गजांच्या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
  • रश्दी यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली कादंबरी ‘क्विशोटे’ आणि अ‍ॅटवूड यांच्या ‘हॅॅण्डमेड्स टेल’ कादंबरीचा दुसरा भाग ‘द देस्टामेंट्स्’ यांनी मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या बुकरच्या अंतिम लघुयादीत स्थान पटकावले.
  • सलमान रश्दी यांना १९८१ मध्ये ‘मिडनाइट चिल्ड्रेन’ यासाठी ‘बुकर’ पारितोषिक मिळाले असून आतापर्यंत पाच वेळा त्यांची पुस्तकं ‘बुकर’च्या स्पर्धेत होती.
  • यावर्षी एकूण १५१ पुस्तकं पुरस्कारासाठी शर्यतीत होती. त्यातून १३ ग्रंथांची लांब यादी महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती.
  • त्यातून अंतिम यादीत कोणत्या पुस्तकांची निवड होईल, याबाबत गेल्या महिनाभर आंतरराष्ट्रीय ग्रंथविश्वात उत्सुकता होती.
  • रश्दी आणि अ‍ॅटवूड यांच्यासह ल्युसी इलमन यांच्या ‘डक्स् न्यूबरिपोर्ट’ या कादंबरीचा समावेश झाला आहे. तिचे वैशिष्टय़ म्हणजे ती एका वाक्याची असून कोणत्याही पूर्णविराम अथवा विराम चिन्हांशिवाय ही हजार पृष्ठांची कादंबरी मांडण्यात आली आहे.
  • ब्रिटिश आफ्रिकी लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो यांची ‘गर्ल, वुमन, अदर’, नायजेरियातील लेखक चिगोझी ओबिओमा यांची ‘अ‍ॅन ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटीज’ आणि तुर्कस्तानमधील वादग्रस्त कादंबरीकार एलिफ शफाक यांची ‘टेन मिनिटस् थर्टी सेकंड्स इन स्ट्रेंज वर्ल्ड’  पुस्तकाची यादीत निवड झाली आहे.
  • यंदा आफ्रिकी स्त्री-मनाचा वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्या या यादीत आहेत, ‘ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटीज’  आणि  ‘गर्ल, वुमन, अदर’. तब्बल १९ वर्षांनी ‘बुकर’च्या यादीत पुस्तकाचा समावेश झाल्याने आनंद झाल्याचे रश्दी यांनी म्हटले आहे.  
  • यंदा ल्यूसी एलमन या अँग्लो-अमेरिकी नावाखेरीज एकही अमेरिकी साहित्यिकाची कादंबरी यादीत नाही.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »