सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा कमी वाघ

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा कमी वाघ
सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा कमी वाघ

पुरेसे भक्ष्य वन्यजीव कॉरिडॉरच्या अभावामुळे व्याघ्रसंख्या मर्यादित

 

देशातील व्याघ्र गणनेत वाघांची संख्या १६ टक्क्य़ांनी वाढल्याचे आणि अधिवासामध्ये २२ टक्क्य़ांची घट झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात मात्र अधिवासाच्या क्षमतेपेक्षा वाघांची संख्या कमी आहे.

विदर्भाबाहेरील महत्त्वाकांक्षी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांसाठी पुरेसे भक्ष्य नसणे, बफर क्षेत्रफळापेक्षा कोअर भागाचे क्षेत्रफळ जास्त असणे आणि वाघांची संख्या जास्त असणाऱ्या कर्नाटकच्या सीमेवरील जंगलांशी योग्य असा वन्यजीव कॉरिडॉर विकसित नसणे इत्यादी कारणांमुळे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या कमी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चांदोली राष्ट्रीय अभयारण्य आणि कोयना वन्यजीव अभयारण्य या दोहोंचा एकत्रित सह्य़ाद्री व्याघ्रप्रकल्प २०१० मध्ये घोषित करण्यात आला. मात्र आजही या व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येबाबत आक्षेप घेतले जातात. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या २०१८च्या व्याघ्र प्रकल्प प्रभावी व्यवस्थापन मूल्यमापनात सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवर शंका उपस्थित करण्यात आली होती. तसेच चांदोली, राधानगरी भागातील बॉक्साइटच्या खाणींवरही आक्षेप घेण्यात आले होते.

‘सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात मुळातच वाघांची संख्या कमी आहे. वाघांचे मूळ ठिकाण तिलारी जंगलात आहे. त्यामुळे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आधी तिलारीला अभयारण्याचा दर्जा द्यावा लागेल. तसेच तिलारी-राधानगरी-चांदोली हा वन्यजीव कॉरिडॉर सुरक्षित होण्याची गरज आहे. तरच तिलारी येथील प्रजननक्षम वाघिणी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात येऊ शकतील,’ असे वन्यजीवतज्ज्ञ किशोर रिठे यांनी सांगितले.

किशोर रिठे यांनी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा निश्चित करण्याच्या समितीत काम पाहिले होते. ‘वन्यजीव अभयारण्यांच्या सीमा निश्चिती, क्षेत्रफळ विकास करताना शास्त्रीय दृष्टिकोनापेक्षा राजकीय दृष्टिकोन अधिक प्रभावी ठरत असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर कोयनेचे बफर क्षेत्र आणखीन वाढवणे गरजेचे असल्याच्या मुद्दय़ावर ते भर देतात.

व्याघ्रगणना अहवालात त्रुटी:-

 • जुलैच्या अखेरीस २०१८ च्या व्याघ्रगणना अहवालात प्रत्येक अभयारण्यानुसार वाघांची संख्या दिलेली नाही. मात्र वाघांच्या संख्येची घनता दर्शविणारे बिंदू विशिष्ट रंगात दिले आहेत.
 • घनतेनुसार रंगाचा गडदपणा वाढतो. सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील बिंदूचा रंग अत्यंत फिकट दर्शविण्यात आला आहे.
 • कोअर क्षेत्रफळ ६००.१२ चौ. किमी, बफर क्षेत्रफळ ५६५.४५ चौ. किमी. आहे.
 • सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अधिवासाच्या क्षमतेपेक्षा कमी आहे.
 • येथील वाघांसाठी भक्ष्य वाढवणे गरजेचे आहे.
 • सांबरांची संख्या या जंगलात वाढायला हवी. ती वाढली तर वाघांची संख्या वाढू शकेल.
 • चांदोली ते तिलारी हा कॉरिडॉर प्रस्तावित असून, त्याबाबत काम सुरू आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल काही माहिती दिली आहे त्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे नोट्स काढून ठेवा

चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो.

राज्यातल्या 33 अभयारण्यांपैकी सहावे राष्ट्रीय उद्यान म्हणून चांदोली अभयारण्यास 14 मे 2004 रोजी दर्जा मिळाला. राज्यात पेंच, मेळघाट, ताडोबा हे तीन पूर्वीचे व्याघ्र प्रकल्प आहेत. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास राज्याचे नाव देश पातळीवर उंचावण्यास मदत होईल.

पश्चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश म्हणजे साक्षात हिमालयाचेच छोटे रूप! याच पर्वतरांगेतील पश्चिम घाटाच्या छायेखालचे कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसर 'स्वतंत्र सह्यादी व्याघ्र प्रकल्प' म्हणून जाहीर झालाय. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून 'सह्यादी व्याघ्र प्रकल्प' अशी रचना असून, या घोषणेमुळे तमाम पर्यावरणप्रेमी आनंदित झाले आहेत. या प्रकल्पाविषयी माहिती दिली आहे राम जगताप यांनी.

वैशिष्ट्ये:-

 • चांदोली आणि कोयनाचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे अधिक संरक्षित
 • हा प्रकल्प विदर्भाबाहेरील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे.
 • मेळघाट, ताडोबा, अंधारी-पेंच या तीन प्रकल्पांनंतरचा 'कोयना-चांदोली' हा राज्याला मिळालेला चौथा प्रकल्प
 • कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रिकरण करून सुमारे साडेसातशे चौरस कि.मी.च्या क्षेत्रांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर केल्यामुळे राज्य शासनाच्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला 'खो' बसला आहे.
 • कोयना अभयारण्य १९८५ मध्ये संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले होते.
 • त्यामधील काही भाग नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणून प्रस्तावित आहे. त्यास स्थानिक भूमिपुत्र व पर्यावरणवाद्यांचाही विरोध आहे. या प्रकल्पाला जमिनी न देण्याचा तेथील लोकांच्या इराद्याला या प्रकल्पामुळे आणखीनच बळकटी मिळाली.
 • पर्यावरणप्रेमींची मागणी पूर्ण झाल्याने सह्याद्रीमधील वाघांबरोबरच तेथे असणाऱ्या गवा, चितळ, सांबर व हरीण अशा प्राण्यांनाही आपोआपच संरक्षण
 • प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध
 • पश्चिम घाटातील वन्यजीवांबरोबरच दुर्मिळ असणाऱ्या वनसंपदेलाही महत्त्व प्राप्त होऊन भविष्यात त्यांच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न होणार असल्याने व्याघ्र प्रकल्पाबरोबरच वनसंपत्ती संरक्षण व संर्वधन होण्यास मदत
 • कोयना नदी व कोयना धरण परिसराचा समावेश असलेला कोयना अभयारण्यातील ४२३.५५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा परिसर आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील ३१७.६७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा भाग व्याघ्र प्रकल्पासाठी

(स्रोत:- व्याघ्रगणना अहवालात अधिकृत 2018)

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »