वाळू शिल्पकार सूदर्शन पट्टनाईक यांनी अमेरिकेत जिंकला पीपल्स चॉईस अवॉर्ड

वाळू शिल्पकार सूदर्शन पट्टनाईक यांनी अमेरिकेत जिंकला पीपल्स चॉईस अवॉर्ड
वाळू शिल्पकार सूदर्शन पट्टनाईक यांनी अमेरिकेत जिंकला पीपल्स चॉईस अवॉर्ड

रेव्ह बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सव

प्रसिद्ध हिंदुस्थानी वाळू शिल्पकार सूदर्शन पट्टनाईक यांनी अमेरिकेत झालेल्या ‘रेव्ह बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सवात’ पीपल्स चॉईस पुरस्कार पटकावला आहे. 16 वा ‘रेव्ह बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सव’ अमेरिकेत पार पडला. या महोत्सवात सूदर्शन पट्टनाईक यांनी ‘प्लास्टिक प्रदूषण थांबवा, आपले महासागर वाचवा’ या विषयावर आधारित नयनरम्य वाळू शिल्पकला साकारली होती. त्यांच्या या शिल्पकलेला महोत्सवात चांगलाच प्रतिसाद मिळाला व त्यांच्या या शिल्पकलेने भरघोस मतांनी पीपल्स चॉईस अवॉर्ड पटकावला.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर सूदर्शन म्हणाले की, “अमेरिकेत मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार हिंदुस्थानासाठी आहे. हिंदुस्थानात प्लास्टिक प्रदूषणावर विजय मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे आणि अशा महत्त्वाच्या विषयाबद्दल लोकांध्ये जनजागृती निर्माण करत आहे.” या महोत्सवासाठी जागतिक स्तरावरील १५ वाळूशिल्पकारांची निवड झाली होती, त्यात सुदर्शन यांचा समावेश होता.सूदर्शन यांनी पुरस्कारप्राप्त या शिल्पात प्लास्टिकच्या पिशवीत अडकलेला कासव आणि त्याच्या शरीराच्या आत चप्पल, बाटल्या आणि काचेसारख्या प्लास्टिकच्या कचऱ्यासह असणारे मासे दर्शविले होते. तसेच माशाची शेपटी मनुष्याच्या तोंडात दाखवली आहे. समुद्रातील अन्न सेवन केल्यावर समुद्रात होणारे प्लास्टिक प्रदूषण मानवी शरीरावर विपरित परिणाम करतात असे या शिल्पात दाखवले होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »