अबायाशिवाय निघाली सौदी महिला

अबायाशिवाय निघाली सौदी महिला
अबायाशिवाय निघाली सौदी महिला

महिला सबलीकरण

There is no tool for development more effective than the empowerment of women. 
-Kofi Annan

 

आपल्या परीक्षेच्या मुख्य परीक्षेत म्हणजे निबंधात  (UPSC also) आपण अश्या उदाहरणांचा वापर करू शकतो. महिला सबलीकरण संदर्भात काही विषय आल्यास आपण चालू घडामोडींमधील काही उदाहरण देऊन आपला निबंध आकर्षक आणि इतरांपेक्षा वेगळा बनवू शकतो.

 • अबाया (बुरख्याचा एक प्रकार) न घालताच एक ३३ वर्षीय सौदी महिला मॉलमधून बाहेर पडल्याने तिने रियाधमधील लोकांचे लक्ष वेधून घेतले. अति पुराणमतवादी इस्लामिक देशांत पूर्ण शरीर झाकणारा काळ्या रंगाचा अबाया किंवा बुरखा घालणं बंधनकारक आहे.
 • गेल्या वर्षी प्रिन्स महंमद बिन सलमान यांनी 'सीबीएस'शी झालेल्या मुलाखतीत, स्त्रियांबाबतच्या ‌वेशभूषेची बंधने शिथिल करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला होता. विशिष्ट प्रकारचा पेहराव बंधनकारक नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांनी असे सूतोवाच केल्यानंतरही कुठलाही अधिकृत नियम लागू न झाल्यामुळे संबंधित प्रथा सुरूच राहिली.
 • याच दरम्यान सोशल मीडियावर काही महिलांनी संबंधित बंधनाबाबत निषेध केला. यासाठी त्यांनी शरीराकृती स्पष्ट दिसणारी स्वत:ची काही छायाचित्रेही 'पोस्ट' केली.
 • यामुळे पुराणमतवादी विचारसरणीच्या लोकांना चिथावण्याचा धोका असूनही, अनेक जण आता गडद रंगांचे पेहराव परिधान करू लागले आहेत. माशेल अल-जलोद यांनी एक पाऊल आणखी पुढे टाकून, बंडखोरी करीत अबाया घालणेच बंद केले आहे.
 • गेल्या आठवड्यात रियाधमधील मॉलमधून एचआर असलेली ३३ वर्षीय महिला केशरी रंगाचा आकर्षक टॉप आणि बॅगी ट्राउझर्स घालून बाहेर पडली. तिला पाहून अनेकांच्या फक्त भुवयाच उंचावल्या नाहीत, तर अनेक जण तिच्याकडे पाहून ऐकू येण्याइतपत हसले. अनेकांनी कुजबूजही केली. ती सेलिब्रिटी असल्याचा काहींचा गैरसमजही झाला.
 • कुणीतरी तिला रस्त्यातच 'तू सेलिब्रिटी आहेस का,' असे विचारल्यावर तिने, 'नाही, मी एक सामान्य महिला आहे. फक्त मला जगायचे आहे,' असे हसून सांगितले. २५ वर्षीय मनहेल अल-ओताबी या कार्यकर्तीनेसुद्धा 'अबाया'ची सक्ती चार महिन्यांपासून झुगारली आहे. 'कुठल्याही बंधनाशिवाय मला फक्त माझ्या मनासारखे जगायचे आहे. मला नको असलेले कपडे घालण्यासाठी कुणीही माझ्यावर सक्ती करू शकत नाही,' असे तिने सांगितले.
 • मुस्लिम महिला गेली अनेक शतके अबाया परिधान करीत असून, हा नियम गेल्या काही दशकांपासून बंधनकारक करण्यात आला आहे. आता तो राज्यातील मुस्लिम नसलेल्या महिलांनाही लागू करण्यात आला आहे. याबाबत कुठलाही स्पष्ट कायदा नाही, कुठलेही संरक्षणही देण्यात आलेले नाही. धर्मांध लोकांकडून यामुळे माझ्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो, असे माशेल अल-जलोदचे म्हणणे आहे. प्रिन्स महंमद यांची टीव्हीवरील मुलाखत पाहिल्यानंतर त्यांनी फक्त महिलांनी सभ्य कपडे परिधान करावेत, इतकेच म्हटले होते. याचा अर्थ 'अबाया' बंधनकारक असणे असा होत नाही, असे जलोदने म्हणताच त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे ट्विट मॉलकडून करण्यात आले आहे. धर्माचा अबायाशी काही संबंध नसल्याचे जलोदने पुढे म्हटले आहे.

मिनाजबाबत व्हिडिओ 'व्हायरल'!:-

 • आपल्या उदार धोरणाचा भाग म्हणून सौदी अरेबिया येथे रॅपर निकी मिनाज हिला सादरीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. तिची गाणी लैंगिक विषयावर असूनही तिला अबाया परिधान करण्यास सांगण्यात आले.
 • याविषयीचा व्हिडिओ सौदी युवतीने पोस्ट केला होता आणि तो व्हायरलही झाला होता. मिनाजने अर्थातच नंतर आपला हा दौरा रद्द केला.

सौदी अरेबिया:-

 • सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. 
 • रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो.
 • सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत. [KBC मध्ये यावर प्रश्न विवचारण्यात आला होता.  आपण KBC साठी तयारी करत नसलो तरी, अश्या प्रकारच्या शो मुळे आपली एकदम व्यवस्थित उजळणी होते, जिथून शिकता येईल तिथून शिकण्याचा प्रयत्न करावा smiley]
 • सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणार्‍या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे.
 • आपण 'भारत आणि कर्कवृत्त' या PDF नोट्स मध्ये कर्कवृत्त कोण-कोणत्या देशातून जाते हे अभ्यासले आहे, सौदी अरेबिया देशातूनही कर्कवृत्त जाते  उजळणी करा. 

Question of the Day:-

सौदी अरेबियाच्या शेजारील असलेले देश म्हणजे जॉर्डन, इराक,  कुवेत, कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती (यूएई) ओमान, व येमेन ह्या सर्व देशांच्या राजधान्या कोणत्या?

नोट्स मध्ये ज्या नकाशाचा संदर्भ दिला आहे त्यावरूनच तुंम्हाला ह्या सर्व देशांच्या राजधान्या लक्षात येतील. नेहमी नकाशा ला प्राधान्य द्या.

Go by Map 
लक्षात ठेवण्यास सोपे जाईल

बघा ह्या  एका न्यूजमुळे आपल्या दोन प्रश्नांची उजळणी झाली.
एक म्हणजे कर्कवृत्त आणि दुसरे जवळपास ८-९ देशांच्या राजधान्या समजल्या.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »