60 दिवसांच्या आत त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उभारा

60 दिवसांच्या आत त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उभारा
60 दिवसांच्या आत त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उभारा

सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

देशभरात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा फैसला सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाची 100 पेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट बनवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 60 दिवसांच्या आत ही पॉक्सो न्यायालय उभारावी, असे आदेश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. ही न्यायालय केवळ अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराबाबतच्या खटल्यांवर सुनावणी घेतील.

लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2012 मध्ये संसदेने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस' (पॉक्सो)हा कायदा पास केला होता. या कायद्यानुसार फक्त अत्याचार करणाराच नाही तर ज्याला अत्याचाराची माहिती आहे, परंतु तो तक्रार दाखल करत नाही तोदेखील आरोपी आहे. मुलांवर अत्याचार करणे, बलात्कार करणे, तसेच त्याची अश्लील चित्रफीत बनवणारादेखील गुन्ह्यास पात्र आहे.

देशभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 100 हून अधिक आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये विशेष पोलिसांची टीम बनवण्याची, जिल्ह्यात विशेष कोर्ट बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 60 दिवसांच्या आत विशेष पॉक्सो कोर्ट उभारण्याचे आदेश दिले आहेत.

देशभरातील प्रलंबित पॉक्सो खटल्यांचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मागवला होती. या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की, मागील सहा महिन्यात देशभरात पॉक्सो अंतर्गत 24 हजार 212 एफआयआर दाखल झाले आहेत. त्यापैकी केवळ 6 हजार 449 गुन्ह्यांचे खटले सुरु झाले आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »