भारतीय लष्कराची मोठी कारवाई पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा

भारतीय लष्कराची मोठी कारवाई पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा
भारतीय लष्कराची मोठी कारवाई पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा

पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न

श्रीनगर : भारतीय लष्कराने काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाच ते सात बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. हे पाकिस्तानी कमांडो भारतीय सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, भारतीय लष्कराने यांना ठार केलं. यांचे मृतदेह अद्यापही नियंत्रण रेषेवर पडलेले आहेत. भारतीय लष्कर आणि घुसखोरांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याने या मृतदेहांना अद्याप ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही. गेल्या 36 तासांपासून ही चकमक सुरु आहे.

यापूर्वी पाकने भारतीय सेना ही नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसीवर क्लस्टर स्फोटकांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानने केलेला आरोप हा खोटा असून पाक आपली फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून लष्कराची काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे. त्यामुळे या भागात गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरुवारी (1 ऑगस्ट) झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं.  त्याशिवाय बांदीपोरा जिल्ह्यात सीमा रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचाही लष्काराने खात्मा केला होता.

वृत्तसंस्था एएनआयने जारी केलेल्या फोटोंमध्ये नियंत्रण रेषेवर चार मृतदेह दिसत आहेत. हे मृतदेह पाकिस्तानच्या एसएसजी कमांडो किंवा दहशतवाद्यांचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्कराच्या शोध मोहिमेत पाकिस्तान सतत अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानकडून शोध मोहिमेत अडचण निर्माण केली जात आहे. यामुळे ते जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचं भारतीय लष्काराने म्हटलं आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »