तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन

तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन
तेजस एक्स्प्रेस देशातील पहिली खासगी ट्रेन

तेजस एक्स्प्रेस

हायलाइट्स
केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलले
दिल्ली-लखनऊ 'तेजस एक्स्प्रेस' ही देशातील पहिली खासगी रेल्वे
रेल्वेच्या खासगीकरणारा नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनचा विरोध
तेजस एक्स्प्रेस ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे
तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च

केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पात यासंबंधीचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने नुकतेच दिले होते. दिल्लीहून लखनऊला जाणारी 'तेजस एक्स्प्रेस' ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. या रेल्वेसंबंधीच्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय १० जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती 'आयआरसीटीसी'ने दिली आहे.

रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काळात देशात दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आक्रमक झाले असले तरी या निर्णयाला आम्ही विरोध करू, असे 'नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन' (NFIR) ने म्हटले आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार असून ती ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च आला आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील व बंद होतील. 

या रेल्वेला खास सजवण्यात आले आहे. तेजस नाव असल्याने रेल्वेच्या डब्याला सूर्यकिरणाचा रंग देण्यात आला आहे. ही एक्स्प्रेस चालवण्याची घोषणा २०१६ मध्ये करण्यात आली होती. दिल्ली-लखनऊ मार्गावर सध्या ५३ रेल्वे चालवण्यात येतात. या मार्गावरील सर्वात प्रीमियम रेल्वे ही सुवर्ण शताब्दी आहे. 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »