इटलीचे सरकार पडले राजकीय तिढा कायम

इटलीचे सरकार पडले राजकीय तिढा कायम
इटलीचे सरकार पडले राजकीय तिढा कायम

हे सरकार केवळ १४ महिने चालले

  • इटलीमधील राजकीय तिढा सोडविण्यासाठी अध्यक्ष सर्जिओ मतरेला सर्वपक्षीयांना भेटणार आहेत. फाइव्ह स्टार मूव्हमेंट, उजवे गट यांचा समावेश आहे. त्यांची युती संपुष्टात आल्यानंतर तेथील सरकार पडले आहे. 
  • पंतप्रधान गिसप काँट यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. हे सरकार केवळ १४ महिने चालले. मतरेला यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील नेत्यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
  • उजवा विचारसरणीचा पक्ष 'ब्रदर्स ऑफ इटली' हा साल्व्हिनी यांच्या लीग पक्षाशी युती करण्याची शक्यता आहे.
  • नव्या युतीचे सरकार किंवा मुदपूर्व निवडणुका असे त्यांच्यासमोर पर्याय आहेत. 'ब्रदर्स ऑफ इटली'चे नेते जॉर्जिया मेलोनी यांनी मतरेला यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'केवळ निवडणुका हा स्थिर सरकारसाठी पर्याय आहे. इटलीची जनताही केवळ याच पर्यायाचा विचार करील.' अध्यक्ष मतरेला यांना या राजकीय तिढ्यातून सोमवारपर्यंत मार्ग काढण्याची शक्यता सूत्रांनी केली. 
  • फाइव्ह स्टार मूव्हमेंट आणि डाव्या आघाडीचा लोकशाही पक्ष यांच्या युतीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाही पक्षाचे नेते निकोला झिंगारेट्टी यांनी युतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. 

इटली:-

  • हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. 
  • रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे. इटलीच्या उत्तरेस स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स व स्लोव्हेनिया हे देश आहेत. पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, पश्चिमेस तिर्‍हेनियन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »