पश्चिम बंगालमध्ये मॉब लिंचिंग करणाऱ्यास फाशी

पश्चिम बंगालमध्ये मॉब लिंचिंग करणाऱ्यास फाशी
पश्चिम बंगालमध्ये मॉब लिंचिंग करणाऱ्यास फाशी

मॉब लिंचिंगमधील आरोपींना तीन वर्षाची शिक्षा

 • मॉब लिंचिंग (झुंडबळी) ला आळा घालण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने आज एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. 
 • जमावाकडून करण्यात येणारा हल्ला तसेच मॉब लिंचिग यासारख्या घटना रोखण्यासाठी लिंचिंग विधेयक मंजूर करण्यात आले आहे. 
 • या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मॉब लिंचिंगमधील आरोपींना तीन वर्षाची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. 
 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आज सभागृहात हे विधेयक मांडले. हे विधेयक लागू झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी तरतूद करण्यात आली आहे. 
 • तीन वर्षाची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा आणि मृत्यूदंडाची शिक्षा या तीन शिक्षेचा यात समावेश आहे. 
 • मॉब लिंचिंग ही समाजाला लागलेली कीड आहे. आपण सर्वांनी एकत्र येवून याविरोधात आवाज उठवायला हवा. उच्च न्यायालयानेही लिंचिंगविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 
 • या विधेयकाचा उद्देश म्हणजे लिंचिंगमध्ये अडकणाऱ्या व्यक्तींना संविधानिक अधिकार मिळायला हवा तसेच यासारख्या घटना ऱोखता यावा हाच खरा त्यामागचा उद्देश आहे. 
 • गुन्हा करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळण्याची यात तरतूद आहे.
 • हा कायदा लागू झाल्यास मारहाण करणाऱ्या किंवा पीडित व्यक्तींना जखमी करणाऱ्या आरोपींना तीन वर्षाच्या शिक्षेपासून जन्मठेपेची शिक्षा मिळू शकते. 
 • जर मारहाणीत पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आरोपी असलेल्या व्यक्तीला जन्मठेप, ५ लाख रुपये दंड किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते, अशी या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे.
   

जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »