रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले काळाच्या पडद्याआड

रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले काळाच्या पडद्याआड
रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतले मल्ल म्हणून ओळख

 • महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतले मल्ल म्हणून ओळख असलेल्या रुस्तम ए हिंद दादू चौगुले यांचं रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
 • महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यामध्ये दादू चौगुलेंनी मोठा हातभार लावला होता.
 • ३ दिवसांपूर्वी दादू चौगुलेंना धाप लागल्यामुळे कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान दादू कोमामध्ये गेले.
 • रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान दादूंना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दादू चौगुलेंनी रौप्यपदकाची कमाई केली होती.
 • त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कोल्हापूर आणि राज्यभरातील त्यांच्या शिष्यांना धक्का बसला आहे.
 • कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत दादूंनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. १९७० साली दादूंनी महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला होता.
 • यानंतर १९७३ सालीच दादूंनी रुस्तम ए हिंद आणि भारत केसरी असे दोन्ही किताब पटकावले होते. कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गेल्या वर्षी २५ डिसेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती गोविंद यांच्या हस्ते ध्यानचंद पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

दादू चौगुले:-

 • चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात कुस्ती खेळायला सुरुवात केली. त्ंना कुस्ती खेळताना कुस्तीगीर गणपतराव आंदळकरांनी पाहिले, आणि ते दादूला घेऊन कोल्हापूरला आले.
 • आंदळकरांनी आणि बाळ गायकवाड, बाळू बिरे यांनी दादूंना कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर तयार झालेला हा कुस्तीपटू उत्तरेतील जबरदस्त ताकदीच्या पहिलवानांशी स्पर्धा करू लागले. तेथे दादूंनी महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद यांसाख्या अनेक मानाच्या गदा जिंकल्या आणि कोल्हापुरात आणल्या.
 •  राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांत दादूंना लाल मातीऐवजी मॅटवर कुस्ती खेळावी लागली. तेथेही त्यांनी कुस्त्या जिंकल्या व दोन वेळा रौप्यपदक मिळवले. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या शंभर किलो गटातील कुस्ती स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक पटकावले.
 • कोल्हापुरातील खासबाग येथे त्यांनी सादिक पंजाबीसारख्या मल्लांना चितपट केले. सतपालबरोबर खेळलेली कुस्ती आणि इ.स. १९६९ मध्ये हरिश्चंद्र माधव बिराजदार यांच्याबरोबरची कुस्ती ते हरले. हरिश्चंद्र माधव बिराजदार यांना महाराष्ट्र केसरी किताब मिळाला.
 • आपल्या कुस्तीच्या कारकिर्दीत त्यांनी देश-विदेशांतील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल मातीमध्ये आणि मॅटवर अस्मान दाखवले.
 • काही वर्षांनंतर त्यांनी स्वत: कुस्ती खेळणे बंद केले, तरी त्यांनी कुस्तीच्या विकासासाठी सक्रिय योगदान दिले. ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष होते. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत होते.
 • राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी विशेष मेहनत घेत घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद चौगुले हा हिंदकेसरी झाला.
 • दादू चौगुले यांनी दोनदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता, त्यांचा हा रेकॉर्ड बराच काळ कोणाही मोडू शकले नव्हते.
 • १९७४ मध्ये Commonwealth गेम्समध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »